Saturday, January 5, 2013



एके समयी भगवान बुद्ध उकट्ठ आणी सेतब्ब ह्या दोन नगरांच्या मधील राज रस्त्यापर्यंत पोहोचले असता, त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करत असताना भेटला. अचानक भगवंतांनी रस्ता सोडला व ते एका वृक्षातळी पद्मासन करुन बसले. भगवंतांच्या पावलांमागुन जात
असणार्या त्या ब्राह्मण द्रोणाला, त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणी संयत
मनाच्या आणी सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले.

भगवंता जवळ जाऊन तो म्हणाला,

द्रोण ब्राह्मण : आदरणीय महाशय आपण
देव तर नाहीत?

भगवान बुद्ध : नाही. ब्राह्मणा, मी खरोखर
देव नाही.
द्रोण ब्राह्मण : आपण गंधर्व तर नव्हेत? भगवान बुद्ध : नाही, नाही! ब्राह्मणा मी गंधर्व नाही!

द्रोण ब्राह्मण : मग आपण यक्ष तर
नव्हेत?

भगवान बुद्ध: नाही, नाही! ब्राह्मणा , मी यक्ष नव्हे. द्रोण ब्राह्मण : तर मग आपण मनुष्य आहात काय?

भगवान बुद्ध: नाही ब्राह्मणा मी मनुष्यही नाही. भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर
तो ब्राह्मण द्रोन म्हणाला, " तुम्हाला तुम्ही देव आहात काय? गंधर्व आहात काय? यक्ष किंवा मनुष्य आहात काय असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण? त्यावर भगवंतानी स्मित हास्य केले, आणी भगवंत म्हणाले, ' ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निरास केला नव्हता तोपर्यंत मी खरोखरच देव, गंधर्व, यक्ष, आणी मनुष्य होतो. पण आता मी आसवापासुन मुक्त झालो आहे, देव, गंधर्व, यक्ष आणी मनुष्य यांच्यासारखा मी रडत नाही. मुळाचे
विच्छेदन करुन बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत, त्याप्रमाणे मला अश्रु येणार नाही. म्हनुण हे ब्राह्मणा तु मला सम्यक संबुद्ध (संपुर्ण जागृत ज्ञानी पुरुष) असे समज

No comments:

Post a Comment